About Us


महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ही रजिस्टर्ड संस्था, गेली ३७ वर्षे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. ही महाराष्ट्रातील गणित शिक्षकांची संघटना असून ती प्राविण्य – प्रज्ञा परीक्षा व त्या परीक्षा संबंधीची मार्गदर्शक पुस्तके यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहूसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे.

वरील परीक्षांची गुणवत्ता महामंडळाने कायम ठेवल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात या परीक्षांनी अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान प्राप्त केले आहे.

‘गणित’ हा विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य असल्याने या विषयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच गणित अध्यापक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.एम. एल. ओगले व पहिले संस्थापक कार्यवाह कै. श्री. पू. ग. वैद्य उर्फ भैया वैद्य यांनी अथक परिश्रम घेउन १९७६ मध्ये “महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाची” स्थापना केली व संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली.

या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी परीक्षा समिती, प्रकाशन समिती, गणित शिक्षण समिती व विद्या समिती या महामंडळाच्या समित्या अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत.

या चार अत्यंत उत्कृष्ठ व गतिमान समित्यांच्या माध्यमातून आज महामंडळाची यशस्वी वाटचाल चालू आहे. मंडळामार्फत घेण्यात येणा-या प्राविण्य व पारंगत परीक्षांच्या फी अत्यंत अल्प असून महामंडळाची सर्व प्रकाशने अत्यंत कमी किंमतीत प्रकाशन समितीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महामंडळाच्या कामकाजात पारदर्शकता असून तो अत्यंत काटकसरीने चालू आहे. महामंडळाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होतात.

आज पर्यंत महामंडळाच्या सर्व निवडणुका अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व गणितप्रेमीं कडून मिळणा-या उत्तम प्रतिसादामुळेच हे महामंडळ प्रभावीपणे आज पर्यंत कार्यरत आहे.

महामंडळाच्या गतिमान व प्रभावी वाटचालीसाठी पालक, शिक्षक व गणितप्रेमींकडून येणा-या अभिप्रायांचे व सूचनांचे महामंडळ स्वागतच करेल. आपणा सर्वांकडून मिळत असलेल्या उत्तम सहकार्याबद्दल ‘महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ’ ऋणी आहे.